या विलगीकरणाच्या काळात दुरदर्शन वर सुरु झालेली जुनी 'रामायण' ही मालिका परत नवीन विक्रम करत आहे, तर तिकडे प्रत्येकाच्या स्टेटसला रामायणाचे काही प्रसंग झळकताना दिसतात, ब-याच वेळा आपल्या संस्कृतीच्या मोठेपणामुळे छाती अभिमानाने भरुन येते. कारण आदर्शाच दर्शन घडवणार रामायण कोणत्याही काळात तेवढचं वंदनीय असणार याबाबत शंका नाही.
पण याच स्टेटस मधील एका प्रसंगाने मात्र मनात संभ्रम निर्माण केला की हे खरच आदर्श आहे का, कारण कौशल्य हे योग्य निवडण्यात असतं हे आज जणू सारे लोक विसरुन गेलेत, याची प्रचिती आली. कारण अनेक शालेय, महाविद्यालयीन व युवक मित्रानी म्हणे 'महाबली कुंभकर्णा' चा आदर्श घेतला. थोडक्यात काय तर आपली योग्यता म्हणजे लायकी दाखवायचा प्रयत्न केला आणि बरं या महाबली कडून नेमकं झोपण्याचे धडे घेतले, आणि आपल्याकडे खादाड म्हणजे बकासुर आणि झोपाळू म्हणजे कुंभकर्ण म्हणायचा पायदंडा आहे मुळी, कोणत्याही गोष्टीचे कारण शोधणे व त्याचा अभ्यास करते हे मुळी आपल्याला ठावूक नाही अथवा शिकवले नसेल.
तर महाविष्णुंचे दोन द्वारपाल 'जय' आणि 'विजय ' हे एका शापाने 'रावण' व 'कुंभकर्ण' झाले (शाप व शापाची पार्श्वभूमीची इकडे जरुरत वाटत नाही) . तर ब्राह्मण कुळात जन्माला आलेले हे भाऊ मातृकुळामुळे राक्षस म्हणून गणले गेले. वेदांचे पठण केलेल्या या भावांनी ब्रम्हदेवाना प्रसन्न करून घेतल आणि कुंभकर्णाचं मन पाहून देवानी सरस्वती मातेकरवी हा त्याच्या तोंडून वर वदवून घेतला 'इंद्रासन' च झाल 'निद्रासन' आणि आमच्या नेटक-यानी नेमकी तीच गोष्ट उचलून धरली.
पण स्वत:च्या मोठ्या भावाला हा अधर्म नको म्हणून सांगणारा, आपला भाऊ जरी अयोग्य असला तरी भरत व लक्ष्मणासारखा पाठीशी खंबीर उभा राहणारा भाऊ, संकटाच्या वेळी देशाशी व कुळाशी प्रामाणिक राहणारा योद्धा म्हणजे महाबली कुंभकर्ण. केवळ एखाद्याचे वाईट गुण प्रकर्शात आणून त्याच्या चांगल्या गुणांवर काळोखी आणणे हे कधीही धर्मसंमत नाही. जर आपल्या आदर्शांचे असे लचके तोडले गेले तर, आपली हीच गौरववान, जाज्वल्य, उज्ज्वल अशी संस्कृती कोणाच्या तोंडावर बघेल?
जरा विचार बदला, आचार बदला, देश आपोआप बदलेल.
||जय भारत|| ||जय श्रीराम||
||जय भारत|| ||जय श्रीराम||
-विश्वनाथ विश्वंभर वालावलकर
No comments:
Post a Comment